Shilpa Shetty | कोर्टानं शिल्पा शेट्टीला(Shilpa Shetty) फटकारलं...माध्यमांविरुद्ध केली होती तक्रार

2021-07-31 2,377

पोलिसांनी दिलेल्या माहितीवर माध्यमांनी बातम्या केल्या तर बदनामी कशी असा सवाल हायकोर्टानं शिल्पा शेट्टीला(Shilpa Shetty) केला आहे. ड्रग्ज रॅकेटप्रकरणी शिल्पाचा पती राज कुंद्राला(Raj Kundra) पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आपल्याविषयी चुकीचे आणि मानहानी करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यापासून मज्जाव करा, अशी मागणी करणारी याचिका शिल्पा शेट्टीकडून दाखल करण्यात आली होती. मात्र मुंबई पोलिसांच्या(Mumbai Police) गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीवरून चौकशीसंदर्भात बातम्यांना केल्या असतील तर त्यावर बदनामीचा दावा कसा होऊ शकतो असा सवाल कोर्टानं शिल्पा शेट्टीला केलाय. पॉर्न रॅकेट(Porn Racket) प्रकरणात राज कुंद्राचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळल्यानंतर शिल्पाने ही याचिका केली होती.
#ShilpaShetty #RajKundra #RajkundraCase #Rajkundraarrested

Videos similaires